लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. सहायक आयुक्त डॉ. राकेश तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.‘एफडीए’ नागपूरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, कामठीतील काही औषधी दुकानांत गर्भपातावरील औषधांची अवैध विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त होती. त्यानुसार औषध निरीक्षक स्वाती भरडे, सतीश चव्हाण व श्री. दे. फुले यांनी कामठी येथील अल्फा मेडिकोज या दुकानात बोगस ग्राहक बनवून पाठविले. या ग्राहकाने गर्भपाताची औषधे मागताच दुकानातील व्यक्तीने थोड्याच वेळात औषधी आणून देतो असे सांगितले. याच दरम्यान औषध निरीक्षक भरडे यांनी याच दुकानांतून गर्भपाताची औषधी मागितली असता विना प्रिस्क्रिप्शन व विक्रीचे बिल न देता औषधी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, औषधांवरील मुदतबाह्य दिनांक, किमतीचा मजकूर खोडलेला होता. ‘एफडीए’च्या चमूने तातडीने दुकानावर धाड टाकत औषधांचा साठा जप्त केला. हा साठा कुणाकडून प्राप्त झाला अशी विचारणा केली असता, दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ‘एफडीए’ दुकानदारास औषधे विक्री करण्याचे आदेश दिले. सोबतच कामठी पोलीस ठाण्यामध्ये औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद १९४० अंतर्गत दुकानदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला. औषधांवरील मुदतबाह्य दिनांक व किमतीचा मजकूर खोडलेला असल्याने हे औषध पुरविण्यामागे मुदतबाह्य औषध वितरणाचा प्रकार तर नाही, यासाठी पोलीस तपास करीत आहे. ही कारवाई सहआयुक्त (औषधे) डॉ. राकेश तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक डॉ. पी.एम. बल्लाळ, सहायक आयुक्त पी.एन. शेंडे यांनी केली.औषधांची अवैध विक्री समाजविरोधी कार्यबेकायदेशीररीत्या गर्भपाताची औषधे विकणे हे समाजविरोधी कार्य आहे. स्त्रीभू्रणहत्येच्या प्रयत्नांना मदत करण्याचे कृत्य आहे. गर्भपातासारख्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर आहे. सध्या अशा पुरवठादारांचा शोध घेणे सुरू आहे.डॉ. राकेश तिरपुडेसहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासनलोकमतचा प्रभाव‘लोकमत’ने ‘गर्भनिरोधक गोळ्यांची बेधडक विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. तोंडातून घेण्यात येणाºया औषधांची सर्रास विक्री होत असल्याचे व कुमारवयीन मुलींमध्ये या गोळ्यांचा वापर वाढल्याचे वास्तव मांडले होते.
नागपुरात गर्भपातावरील औषधांच्या अवैध विक्रीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 9:12 PM
गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्दे‘एफडीए’ची कारवाई : औषधांवर मुदतबाह्य दिनांक व किंमतही खोडलेली