लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील इस्माइलपुरा बुनकर काॅलनी परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कामठी (नवीन) पाेलिसांनी धाड टाकून एका आराेपीला अटक केली. त्याच्याकडून ८४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये आठ जनावरांची सुटका करीत पाेलिसांनी त्यांना जीवदान दिले. ही कारवाई रविवारी (दि.२२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
अफजल खान ऊर्फ साेनू हबीब खान (२०, रा. वारीसपुरा, दराेगा मशीदजवळ, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. इस्माइलपुरा बुनकर काॅलनी परिसरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी अवैध कत्तलखान्यावर धाड टाकली असता, एका बंद घरात गुरांची कत्तल करून गाेमांसाची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ४० किलाे गाेमांस, दाेन सतूर व आठ जनावरे असा एकूण ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सर्व जनावरांना कामठी परिसरातील गाेरक्षण केंद्रात सुरक्षित पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आराेपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा २०१५ नुसार गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार विजय मालचे, दुय्यम पाेलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, संजय पिल्ले, राजू टाकळकर, कमल कनाेजिया, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली.