लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना बगडगंजमधील कुख्यात अनिल धावडेच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याच्या साहित्यासह ५८,८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य आरोपी मटका किंग अनिल धावडे आणि त्याचा साथीदार श्रावण ऊर्फ गोलू डायरे हे दोघे मात्र फरार झाले.जुगार अड्डा, मटका अड्ड्यासह अनेक अवैध धंद्यात धावडे बंधू गुंतले होते. प्रारंभी त्यांच्या अवैध धंद्यांचे नेटवर्क फारच व्यापक होते. पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावून धावडेचे अवैध धंद्यांचे नेटवर्क पुरते मोडून काढले. त्यामुळे धावडे आता लपूनछपून मटका अड्डा आणि असेच अवैध धंदे चालवतो. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुख्यात अनिल धावडेच्या मटका अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांचा छापा पडताच मटका अड्ड्यावरील अनेक जण पळून गेले. मात्र, आकाश तुलसीराम डायरे, राजेश अभिमान गोंडाणे, अनिल गोडबोले, अर्पण मोरेश्वर टेंभूर्णे, शिवराज मनीराम पुरूषोत्तमराव , विलास रामदास दहाट, विनोद शंकरराव भिवापूरकर, विशाल दिलीप बावणे आणि मंगेश राजेश बावणे या नऊ जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य आणि रोख असा एकूण ५८८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून लकडगंज ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच अनिल धावडे आणि गोलू डायरे पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नागपुरात मटका अड्ड्यावर छापा; गुन्हे शाखेच्या एसएसबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:44 AM
जुना बगडगंजमधील कुख्यात अनिल धावडेच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली.
ठळक मुद्देनऊ आरोपी जेरबंद, रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त