शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

नागपुरात आॅनलाईन जुगार अड्ड्यावर छापा : १०.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:17 PM

ठिकठिकाणच्या जुगाऱ्यांना एकाच लाईनवर (आॅनलाईन) एकत्र करून तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार खेळून घेणाऱ्या  १२ आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह १० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देवर्धेचे १२ जुगारी गजाआड : लकडगंज पोलिसांची कारवाईशहरातील पहिली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणच्या जुगाऱ्यांना एकाच लाईनवर (आॅनलाईन) एकत्र करून तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार खेळून घेणाऱ्या  १२ आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह १० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारची आॅनलाईन जुगार अड्ड्यावरील ही शहरातील पहिली कारवाई आहे.आरोपी अंकुश भगवान पंजवानी (वय २८, रा. दयालनगर, वर्धा) याने महिनाभापूर्वी वर्धमाननगरातील नीलेश ढिंगरा यांची सदनिका भाड्याने घेतली. पूजा सोसायटीतील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या या सदनिकेत पंजवानीने आॅनलाईन लॉटरीप्रमाणे आॅनलाईन तीन पत्तीचा जुगार सुरू केला. दिवसभरात लाखो रुपयांचे कमिशन मिळविणाºया आरोपी पंजवानीने हा जुगार खेळून घेण्यासाठी रवी हुंदराज नानवानी (वय १९, रा. दयालनगर) यालाही आपला विश्वासू म्हणून याच सदनिकेत ठेवले आणि तेथे तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार सुरू केला. असंख्य जुगारी लाखोंची हारजिीा करीत असल्यामुळे पंजवानीने नानवानीसोबतच हा जुगार खेळून घेण्यासाठी (खायवाडी-लगवाडीसाठी) अनिकेत शंकर ढाले (वय १८, रा. गणेशनगर, बोरगाव मेघे, वर्धा), बादल उत्तम बावणे (वय १८, रा. मास्टर कॉलनी सावंगी, जि. वर्धा), गजेंद्र पुंडलिकराव फटिंग (वय १९, रा. गणेशनगर कळंबे लेआऊट, वर्धा), मंगेश अनिल महाकाळकर (वय २५, रा. स्टेशन फैल, वर्धा), शुभम भारत गणवीर (वय २०, रा. दयालनगर, वर्धा), सुरेश श्रावण वाकडे (वय २३, रा. कोरा, समुद्रपूर, ज. वर्धा), सुजित बाबूलाल फुलमाळी (वय १८, रा. हिवरा-सेलू, जि. वर्धा), अक्षय अशोक मेंढे (वय २०, रा. दयालनगर वर्धा), पंकज बजरंग वाघमारे (वय १९,रा. स्टेशन फैल, वर्धा) आणि अनिल मुकुंदराव डोंगरे (वय २४, रा. रेल्वे स्थानकाजवळ वर्धा) यांनाही सोबत घेतले.मोबाईलमध्ये चीप्स बसवून आॅनलाईन जुगार डाऊनलोड करून पंजवानी आपल्या साथीदारांच्या मदतीने जुगाºयांना जुगार खेळायला भाग पाडत होता. त्याच्या या गोरखधंद्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळताच बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ढिंगरा यांच्या सदनिकेत छापा घातला.यावेळी उपरोक्त १२ आरोपी तेथे तीन पत्ती (ब्लार्इंड) जुगार खेळावर पैशाची लगवाडी-खायवाडी करून घेताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकाच कंपनीचे १०५ मोबाईल, रोख ७ हजार आणि अन्य साहित्यासह १० लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पॉर्इंटचे नाव अन् पैशाचा खेळपोलिसांनी पंजवानीला ताब्यात घेतल्यानंतर हा जुगार कसा भरवला जातो आणि ठिकठिकाणचे जुगारी एकाच वेळी ते कसा खेळतात, कशी पैशांची हारजित होते, त्याबाबत आरोपींकडून माहिती जाणून घेतली. त्यानुसार संकेतस्थळावर गेल्यानंतर या जुगारात सहभागी होता येते. जुगाऱ्याला विशिष्ट रकमेत विशिष्ट किमतीचे पॉर्इंट खरेदी करून जुगारात सहभागी होता येते. तो ती रक्कम (पॉर्इंट) हरला तर त्याला पुन्हा आॅनलाईन पेमेंट करून पॉर्इंट विकत घ्यावे लागतात. जिंकला तर तेवढे पॉर्इंट (रक्कम) त्याच्या खात्यात जमा होते. बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असणारेच हा जुगार खेळतात. हा जुगार भरविणाऱ्या पंजवानीसारख्याला दिवसाकाठी लाखोंचे कमिशन मिळते.वर्धा येथे झाली होती कारवाईसर्वच्यासर्व आरोपी वर्धा येथील रहिवासी आहेत. काही जण नागपुरात भाड्याने राहतात तर काही जण येणे-जाणे करतात. पंजवानी गेल्या वर्षीपर्यंत हा जुगार अड्डा वर्धेतून चालवायचा. तेथील पोलिसांनी छापा घातल्यामुळे पंजवानीने वर्धा येथून गाशा गुंडाळला आणि दीड ते दोन महिन्यांपूर्वी आरोपी पंजवानीने १५ हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने ढिंगरांकडून सदनिका भाड्याने घेत येथे हा अड्डा सुरू केला होता. पोलिसांनी बुधवारी तेथे छापा घालताच येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात उपनिर्रीक्षक पीजी गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार त्रियोगी तिवारी, दीपक कारोकार, अजय रोडे, नायक रंजित सेलकर, शुनील ठवकर, सतीश पांडे, भूषण झाडे, शिवराज पाटील, प्रवीण गाणार आदींनी बजावली.

टॅग्स :onlineऑनलाइनCrimeगुन्हा