लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या घरी महिला-मुलींना बोलवून त्यांना वेश्या व्यवसायास जागा उपलब्ध करून देणाऱ्या नंदनवनमधील सुशिला आंटी ऊर्फ शांता गेडाम (वय ५०) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी सायंकाळी छापा घातला. येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने दिलेल्या बयानाच्या आधारे पोलिसांनी नंदनवन ठाण्यात सुशिला आंटीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली.सुशिला आंटी ऊर्फ शांता गेडाम न्यू वाठोडा ले आऊटमधील सरोदे नगरात राहते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला-मुलींना ती स्वत:च्या घरी देहविक्रय करण्यास जागा उपलब्ध करून देत होती. स्वत: ग्राहक घेऊन येणाऱ्या महिला, मुलींची तिच्या कुंटणखान्यावर सारखी वर्दळ राहायची. ती स्वत:ही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुलींसाठी ग्राहक शोधत होती. ही माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला कळताच तिला अटक करण्यासाठी एसएसबीने सापळा लावला. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तिच्याकडे पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठविला. ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतर सुशिला आंटीने त्याला एक तरुणी उपलब्ध करून दिली. ग्राहकाने एसएसबीच्या अधिकाऱ्याला संकेत देताच एसएसबीचे पथक तिच्या कुंटणखान्यावर धडकले. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीने सुशिला आंटी पैशाचे प्रलोभन देऊन हे काम करवून घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तिला तसेच सुशिला आंटीला ताब्यात घेतले. एसएसबीचे हवलदार मुकुंदा गारमोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुशिला आंटीविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात कलम ३७० भादंवि तसेच पिटा कायद्याचे सहकलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली. पुढील चौकशी सुरू आहे.
नागपुरातील नंदनवनमध्ये कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 9:47 PM
स्वत:च्या घरी महिला-मुलींना बोलवून त्यांना वेश्या व्यवसायास जागा उपलब्ध करून देणाऱ्या नंदनवनमधील सुशिला आंटी ऊर्फ शांता गेडाम (वय ५०) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी सायंकाळी छापा घातला. येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने दिलेल्या बयानाच्या आधारे पोलिसांनी नंदनवन ठाण्यात सुशिला आंटीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
ठळक मुद्देकुख्यात सुशिला आंटी गजाआड : एसएसबीची कारवाई