लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी (रामटेक) : देवलापार पाेलिसांनी दाेन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकून चार आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून माेहफुलाची दारू व इतर साहित्य असा एकूण १ लाख १० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.२२) करण्यात आली.
देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेरबाहुली शिवारात नाला काठावर हातभट्टी लावून माेहफुलाची दारू गाळली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी या शिवारात धाड टाकून आराेपी विलास इनवाते, अर्जुन काेकाेडे व कमलाकर पंधरे या तिघांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून १२० लीटर माेहफुलाची दारू, सडवा व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई टुमरीटाेला शिवारात करण्यात आली. या शिवारात सुरू असलेल्या दारूभट्टीवर धाड टाकत पाेलिसांनी आराेपी रविशंकर भलावी यास अटक केली. येथील कारवाईत ७० लीटर माेहफुलाची दारू, माेहफुलाचा सडवा व इतर साहित्य असा ३६,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दाेन्ही कारवाईत माेहफुलाच्या दारूसह एकूण १ लाख १० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन अलूरकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण बाेरकुटे, पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, नाईक पाेलीस सतीश नागपुरे, गजानन जाधव, अमाेल चिकने, मनीष चाैकसे यांच्या पथकाने केली.