शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

गंगा-जमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 11:41 PM

लकडगंजमधील रेड लाईट एरिया गंगाजमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पॉश कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून राजस्थानमधील दोन तरुणींना रंगेहात पकडले.

ठळक मुद्देपॉश कुंटणखाना उजेडात : राजस्थानमधील दोन वारांगना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंजमधील रेड लाईट एरिया गंगाजमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पॉश कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून राजस्थानमधील दोन तरुणींना रंगेहात पकडले. हा कुंटणखाना चालविणारी अलका गुमगावकर (वय ३५) आणि मोनी गुमगावकर (वय २९) या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला.गंगाजमुना परिसर देहविक्रयासाठी अनेक वर्षांपासून कुपरिचित आहे. मात्र, दोन वर्षांपासून पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्याने येथील अनेक वारांगनांनी कुंटणखाने सोडून दुसरीकडे पळ काढला. मात्र, काही वारांगना अजूनही येथेच धंदा करतात. त्यांच्यातीलच अलका आणि मोनी व त्यांच्या दलालांनी ग्राहकांसाठी व्हाईट हाऊसची निर्मिती केली होती. वारांगना आणि ग्राहकांची तेथे दिवसभर वर्दळ असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत होता. त्यातून गुन्हे शाखेच्या पथकाला व्हाईठ हाऊसची टीप मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आपल्या पंटरच्या माध्यमातून या कुंटणखान्याच्या दलालाशी सौदा केला. अडीच हजारात तरुणी उपलब्ध करून देण्याचे ठरल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पंटर पाठोपाठ कुंटणखान्यावर धडक दिली. तेथे अलका आणि मोनी तसेच त्यांच्या ताब्यातून देहविक्रय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही तरुणी राजस्थानमधील मूळ निवासी असून अनेक वर्षांपासून त्या वेश्याव्यवसायात सक्रिय असल्याचे समजते. दरम्यान, व्हाईट हाउसमधील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारल्याचे कळताच या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनी कारवाई सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत अड्ड्यासमोर मोठी गर्दी केली होती.मोबाईलवर मुंहदिखाई!येथे येणाऱ्या ग्राहकांना अलका आणि मोनीचे दलाल मोबाईलवर वारांगनांचे फोटो दाखवत होते. त्यानंतर पसंत केलेल्या वारांगनेला बोलवून ग्राहकाच्या हवाली केले जात होते. येथे अनेक वारांगना रोज वेश्याव्यवसाय करीत होत्या. पोलिसांच्या तपासात भली मोठी यादी उजेडात येऊ शकते. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.वृत्त लिहिस्तोवर लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :raidधाडProstitutionवेश्याव्यवसाय