लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अजनी, कळमना तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीच्या गुत्त्यांवर छापे घातले. या ठिकाणावरून एक्साईजच्या पथकाने ५८ लिटर देशी दारू आणि १७२ लिटर मोहाची अशी एकूण २७ हजार ३६ रुपये किमतीची दारू जप्त केली. तसेच दारू विक्री करणा-या १३ आरोपींना अटक केली.एक्साईजचे पोलीस अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी आपल्या सहका-यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू तस्करी आणि विक्री करणारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. अनेक भोजनालये, ढाबे आणि हॉटेलमध्येही त्यांनी छापे घातले आहे. सोमवारी अजनी, कळमना तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे अवैध दारू विक्री करणा-याश्रावण सखाराम वरखडे,कोस्तुभ अशोक वाघमारे, मोहम्मद नाजीर मोहम्मद जुनेद शेख, सुशीला कमिला गुरडे, दुर्गा वामन गोखले, संतोष बाबुलाल शिरसार, लक्ष्मण श्रीरामजी अळमारे, गीता जगदिश बेळेकर, दुर्गा प्रमोद बिजळेकर, विनोद नाजुकराव भोजळे, राजेशविंग रामखय्यन चंदेव, प्रवीण खेमराज कोठारे, प्रमिला धनश्याम रेकाम यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २७ हजार ३६ रुपये किमतीची दारू जप्त केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली.एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, प्रशांत येरपुडे, कवडू रामटेके, जवान राहुल पवार, निलेश पांडे, महादेव कांगणे तसेच सोनाली खांडेकर आणि वाहन चालक रवींद्र निकाळजे यांनी ही कारवाई केली.
उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी : १३ दारू विक्रेते गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:10 AM
राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अजनी, कळमना तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीच्या गुत्त्यांवर छापे घातले.
ठळक मुद्दे२७ हजारांची दारू जप्त