शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

रेल्वे वाहतुकीला लागला ‘ब्रेक’

By admin | Published: June 20, 2015 3:04 AM

नागपुरातून चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. परंतु शुक्रवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इटारसीत ....

१९ गाड्या रद्द : चारही दिशांची वाहतूक विस्कळीतनागपूर : नागपुरातून चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. परंतु शुक्रवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इटारसीत दोन दिवसांपूर्वी आरआरआय कॅबिनमध्ये झालेल्या आगीच्या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून प्रवाशांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १९ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला. यातील काही रेल्वेगाड्या २० जूनच्या तर काही २१ जूनच्या आहेत. याशिवाय १३ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून १० रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. यात आंध्रप्रदेश एक्स्प्रेस १० तास, गोरखपूर-कृष्णराजारामपुरम स्पेशल ९ तास, निजामुद्दीन-बेंगळुरु राजधानी एक्स्प्रेस १.५० तास, मुंबई-हावडा समरसता एक्स्प्रेस १० तास, पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस ६ तास, नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ७ तास, नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ६ तास, बेंगळुरु-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २ तास, सिकंदराबाद-पटना संघमित्रा एक्स्प्रेस १० तास, मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस ५.१५ तास आदींचा समावेश आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सेवाग्राम एक्स्प्रेसला इगतपुरीत संपविण्यात आले. शुक्रवारी सेवाग्राम एक्स्प्रेस इगतपुरीतून नागपूरसाठी रवाना झाली. मुंबईवरून हावडा आणि इतर भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी १२१६७ एलटीटी-वाराणशी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ११०७१ एलटीटी-वाराणशी कामायनी एक्स्प्रेस, १५१०२ सीएसटी-छपरा एक्स्प्रेस, १२१६१ एलटीटी-आगरा कँट, १२१४२ राजेंद्रनगर-एलटीटी, १२१५४ हबीबगंज-एलटीटी आणि १२१८७ जबलपूर-सीएसटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून तात्काळ तिकिटाच्या प्रवाशांना आॅनलाईन रक्कम परत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मार्ग बदलविलेल्या रेल्वेगाड्यारामेश्वरम-वाराणसी एक्स्प्रेस, बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस, निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस, यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेस, म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस, पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस, रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, सिकंदराबाद-पटना स्पेशल, भगत की कोठी-मन्नारगुडी एक्स्प्रेस, सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेस, चेन्नई-बिकानेर एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत.रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२० जून)विशाखापट्टणम-निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस, जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस, जयपूर-नागपूर एक्स्प्रेस, दानापूर-यशवंतपूर पाटलीपुत्र एक्स्प्रेस, पूर्णा-पटना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय २१ जूनची जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, कन्याकुमारी-जम्मूतावी एक्स्प्रेस आणि २३ जूनची यशवंतपूर-लखनौ एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.