लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी देशभरात ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. नागपुरातही मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने इतवारी येथील ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून १.४४ लाखाची ८६ ई-तिकीट आणि रोख ३३९४० रुपये असा एकूण २.२३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तरीत्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालावर धाड टाकली. मध्य रेल्वे नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक आर. के. राम, मोहम्मद मुगसुद्दीन, अश्विन पवार, विकास शर्मा आदींची चमू गठित करण्यात आली. चमूने इतवारी रेल्वेस्थानकाजवळील इच्छा इंटरनेट कॅफे टुर अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानात धाड टाकली. यावेळी दुकानाचा मालक सम्यक दीपक काळे (३४) रा. मिर्ची बाजार, जयभीम चौक याने सात पर्सनल व फेक आयडीचा वापर करून १४ लाईव्ह तिकीट किंमत १४२८४ आणि पूर्वी ७ बनावट आयडीचा वापर करून १ लाख २९ हजार ४८५ रुपयांचे ७२ ई-तिकीट काढले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या दुकानातून ३ कॉम्प्युटर, एक प्रिंटर, एक मोबाईल असा ४६ हजाराचा मुद्देमाल, रोख ३३९४० रुपये जप्त करण्यात आले.
दहा महिन्यात १.१६ कोटीच्या ई-तिकीट हस्तगतमध्य रेल्वे आणि दपू मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया २३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १.१६ कोटी रुपये किमतीची ई-तिकीटे जप्त केली आहेत.