शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे गार्डचे नागपुरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:01 PM

रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट या आंदोलनात सहभागी झाले.

ठळक मुद्देमागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट या आंदोलनात सहभागी झाले.नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोको पायलट लॉबीच्या परिसरात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. के. शुक्ला यांनी केले. शुक्ला यांनी रेल्वेच्या लोकोमोटिव्ह वर्कशॉप, कोच फॅक्टरी, रेल्वेचे संचालनात खाजगीकरण आणि रेल्वेत गुंतवणुकीला चालना देण्याच्या विरोधात तीव्र विरोध दर्शविला. ते म्हणाले, खाजगीकरणामुळे रेल्वे संपणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. परंतु शासनाचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शुक्ल यांनी नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना सुरु करावी, लोको रनिंग स्टाफला देण्यात येणाऱ्या किलोमीटर अलाऊन्सची मोजणी आरएसी फॉर्म्युला १९८० नुसार करावी, रनिंग अलाऊन्सचा आयकर स्लॅब वाढवावा आणि २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या रनिंग स्टाफच्या पेन्शनबाबतच्या समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केली. आंदोलनात आर. के. राणा, एम. पी. देव, इंद्र राज, पी. बी. बारीक, एम. के. त्रिपाठी, अखिलेश कुमार यांच्यासह लोको रनिंग कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीagitationआंदोलन