जलालखेडा : दाेन वर्षापूर्वी आजारपणाने आईचे निधन झाले. अशातच २१ एप्रिल २०२१ राेजी वडील विनायक उईके यांचीही प्राणज्याेत मालवली आणि त्यांच्या चार मुलींवर दु:खाचा डाेंगर काेसळला. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने निराधार झालेल्या चार मुलींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. नरखेड तालुक्यातील रामपुरी येथील उईके भगिनींना मदत करण्याचे आवाहन लाेकमततर्फे करण्यात आले. त्याला अनेकांनी प्रतिसाद देत निराधार मुलींना मदत केली असून, मदतीचा ओघ सुरू आहे.
अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाच आई-वडिलांचे छत्र हरपले. यामुळे निराधार झालेल्या उईके भगिनींच्या वेदनेने समाजमन हळहळले. सामाजिक कार्यकर्ते, लाेकप्रतिनिधी व नागरिकांनी मुलींना मदतीचे हात पुढे केले. दरम्यान नरखेड येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी रामपुरी गाठत मुलींना मदतीचा धनादेश दिला. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुताेष पांडे, रेल्वे सुरक्षाबल निरीक्षक किरणकुमार भाेसले, सहायक उपनिरीक्षक रमेश वाघमारे, प्रधान आरक्षक जगदिश नेहते, रवींद्र वर्मा आदी उपस्थित हाेते. आईवडील नसलेल्या या मुलींना जगण्यासाठी बळ मिळावे, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार व्हावा म्हणून ही मदत केल्याची भावना रेल्वे अधिकारी किरणकुमार भाेसले यांनी व्यक्त केली.
240721\150-img-20210724-wa0022.jpg
फोटो ओळी. उईके बघिनिना 5 हजार रुपयांचा धनादेश देताना आशुतोष पांडे, किरणकुमार भोसले, रमेश वाघमारे, जगदीश नेहते, रवींद्र वर्मा.