शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

उपराजधानीत ‘हिवसाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 9:34 AM

उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... !

ठळक मुद्दे रेनकोट घालावा की स्वेटर? थंडी, पावसामुळे गारठले नागपूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... ! एरवी ऊन-पावसाचा खेळ नेहमीच अनुभवणाऱ्या नागपूरकरांनी सोमवारी थंडी व पावसाची गारठविणारी युती अनुभवली. घराबाहेर निघताना ‘रेनकोट’ घालावा की ‘स्वेटर’, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. घसरलेला पारा, पाऊस आणि बोचरा वारा यामुळे शहरात ‘हिवसाळा’ हा नवाच ऋतू दिसून आला.

‘हिल स्टेशन’चा अनुभवसाधारणत: डिसेंबर महिन्यात उपराजधानीत पाऊस पडत नाही. मात्र सोमवारी पावसामुळे ‘हिल स्टेशन’चा अनुभव येत होता. विशेषत: फुटाळा तलाव परिसर, सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्ससारख्या भागांमध्ये तर वातावरणत तसेच झाले होते. सायंकाळनंतरच शहरातील विविध भागात शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, शिवाय वारेदेखील वाहत होते. त्यामुळे हुडहुडी भरल्याचे जाणवून आले. दुपारी १च्या सुमारास शहरातील काही भागात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळीदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. वारे, पाऊस यांच्यामुळे दिवसभरात पारा खालावला. मात्र रात्री किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले तर कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र व फेथई चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरणात बदल झाला आहे. डिसेंबर असूनदेखील पारा हवा तसा खालावला नव्हता. मात्र वातावरणातील बदलाने गारठा भरला. या चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास आर्द्रतेची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहू शकते, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.रायपूरची पाच विमाने नागपूरकडे ‘डायव्हर्टसोमवारी छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केल्यामुळे भूपेश बघेल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार होते. पण हा सोहळा खराब हवामानामुळे काहीसा गोत्यात आल्यासारखा दिसला. कारण सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध शहरातून रायपूरकडे जाणारी पाच विमाने लॅण्ड झाली. रायपूरमध्ये पसरलेल्या धुक्यांमुळे व्हिजिबिलिटी (दृश्यता) कमी झाल्यामुळे या विमानांना नागपूरकडे डायव्हर्ट करण्यात आले होते. सर्वच विमाने सोमवारी सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान विमानतळावर उतरली. यात इंडिगो एअरलाईन्सचे दिल्ली-रायपूर ६ ई २७५७ हे विमान ८.३० वाजता लॅण्ड झाले. हैदराबाद-रायपूर ६ ई ३८४ हे विमान ९ वाजता उतरले. जेट एअरवेजचे दिल्ली -रायपूर हे विमान ९ डब्ल्यू ७४६ सकाळी ८.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले. त्याचबरोबर जेटलाईटचे मुंबई-रायपूर एस २-३७७ हे तीन तास उशिरा उडल्यानंतरही सकाळी ९ वाजता नागपुरात उतरले. एअर इंडियाचे दिल्ली-रायपूर एआय ४६९ हे विमान सुद्धा नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे की, काही विमाने दिल्ली विमानतळावरूनच उडण्यास उशीर झाला. विशेष म्हणजे छत्तीसगडला भूपेश बघेल यांचा सोमवारी शपथविधी समारंभ होता. या समारंभासाठी दिल्ली येथून कॉँग्रेसचे दिग्गज नेतेगण पोहचणार असल्याचा अंदाज होता. पण नागपूर विमानतळावर डायव्हर्ट होऊन उतरलेल्या विमानातून कुणीही प्रवासी उतरले नाही. ही विमाने अर्धा तास थांबून राहिली. सकाळी १० नंतर काही मिनिटांच्या अंतरामध्ये नागपुरातून रायपूरकडे रवाना झाली.

१००० पेक्षा कमी होती व्हिजिबिलिटीविमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रानुसार सोमवारी सकाळी रायपूर विमानतळावरील हवामान खराब असल्याने व्हिजिबिलिटी १००० मीटरपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे रायपूर विमानतळावर विमानांना उतरण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विमानातील वैमानिकांनी जवळच्या नागपूर विमानतळावर लॅण्डींग करण्यास परवानगी मागितली होती.

११ रेल्वेगाड्याही लेटसोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर ताटकळत बसून राहण्याची पाळी आली. यामुळे वेटिंग रुम फुल्ल झाल्याचे दिसले. टाटानगरजवळ रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम सुरू असल्यामुळे आणि धुक्यामुळे नागपुरातून जाणाºया ११ रेल्वेगाड्या सोमवारी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दरम्यान उशिराने येणाºया रेल्वेगाड्यात हावडा-पुणे आझादहिंद, रक्सोल-हैदराबाद, हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, कटरा-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना, टाटानगर-लोकमान्य टिळक टर्मिनस लेट होती.

 

 

 

टॅग्स :Rainपाऊस