शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

नागपुरात नववर्ष स्वागताच्या आनंदावर पावसाचे विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:50 PM

नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देदिवसाही पारा खालावला : पाऊस आणि शीतलहरींचा पूर्वसंध्येला कहर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. यामुळे पारा चांगलाच खालावला होता.सकाळी शहरातील वातावरण ढगाळी होते. काही काळ उनही पडले, मात्र दुपारनंतर अचानकपणे पाऊस आला. त्यानंतर सर्वत्र शीतलहर सुरू झाली. रात्रीपर्यंत हे वातावरण कायम होते. दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा ५ अंश सेल्सिअसने घटून २३.१ वर पोहचले. या हवामानामुळे दिवसाचे तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. मागील २४ तासात यात बरीच घट झाली.कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात अचानकपणे हा बदल जाणवला. हवामान खात्याने यापूर्वीच संभाव्य वातावरणाची सूचना दिली होती. जिल्हा प्रशासनानेही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी गारांचा पाऊस होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.अचानक बदललेल्या या वातावरणामुळे नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी केलेली अनेकांची तयारी वाया गेली. मोकळ्या मैदानात अथवा घरांच्या गच्चीवर गार वाऱ्याचा सामना न करता आल्यामुळे अनेकांना घरातच नव वर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करावा लागला.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात एक मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर अकोल्यात २.१, अमरावतीमध्ये एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.विदर्भात चंद्रपुरातील वातावरणाचा पारा ५.७ अंशावर सर्वात खाली होता. गडचिरोलीत ८ अंशावर किमान तापमान नोंदविण्यात आले. या शिवाय अन्य जिल्ह्यातही पारा खाली उतरलेला होता. यवतमाळमध्ये किमान तापमान विदर्भातून सर्वात अधिक म्हणजे १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.३ जानेवारीपर्यंत पावसाचे वातावरणहवामान खात्याच्या माहितीनुसार, ३ जानेवारीपर्यंत वातावरण पावसाळी राहण्याची शक्यता आहे. आकाशात ढग राहतील. थांबून थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळी वातावरण दूर होताच पुन्हा जोराची थंडी पडू शकते, असा अंदाज आहे. पावसाच्या वातावरणामुळे दिवसाचे तापमानही खालावलेलेच राहील, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :New Yearनववर्षRainपाऊसnagpurनागपूर