सखल भागात पाणी साचले : वाहतूक विस्कळीत : नागरिकांची तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या तासात शहरातील काही भागात रस्त्यावर पाणी साचले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या, तर काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर रस्त्यांवरील झाडे हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची धावपळ झाली.
रहाटे कॉलनी, माटे चौकात झाड पडल्याने रस्त्यांच्या एका बाजूची वाहतूक बंद पडली. सेंट्रल मॉलकडून दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले होते. काचीपुरा परिसरातही पाणी साचले. सुभाषनगर चौकात झाड पडले. तसेच रामनगर, गांधीनगर, अंबाझरी टी पॉइंंट, जयताळा रोड, त्रिमूर्ती नगर येथील एनआयटी गार्डन, तेलंगखेडी, शंकर नगर, जुना फुटाळा, गोपाल नगर, वायुसेना नगर, खामला आदी ठिकाणी झाडे पडल्याने काही वेळ रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
सुभाष नगर ते माटे चौक दरम्यान मोठे झाड पडल्याने एका बाजूची वाहतूक बंद पडली होती. हिंगणा मार्गावर दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे वाहनांची रांग लागली होती. स्वावलंबी नगरचा रस्ता काही वेळ बंद होता. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शहरातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी आल्या. परंतु मंगळवारी दुपारी पडलेल्या पावसाने अर्ध्या तासातच शहराची दाणादाण उडवली. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांना जागा मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. काहींना पावसात भिजावे लागले. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. लवकरच विदर्भासह नागपूर शहरातही दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
....
जोराचा पाऊस आल्यास काय होणार?
मंगळवारी दुपारी अर्ध्या तासात शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला नसल्याने पाणी तुंबले. पावसाळ्यात जोराचा पाऊस आल्यास काय होणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. आता तरी मनपाची यंत्रणा जागी होईल, अशी अपेक्षा आहे.
सखल भागात पाणी साचले : वाहतूक विस्कळीत : नागरिकांची तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या तासात शहरातील काही भागात रस्त्यावर पाणी साचले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर रस्त्यांवरील झाडे हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
रहाटे कॉलनी, माटे चौकात झाड पडल्याने रस्त्यांच्या एका बाजूची वाहतूक बंद पडली. सेंट्रल मॉलकडून दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले होते. काचीपुरा परिसरातही पाणी साचले. सुभाषनगर चौकात झाड पडले. तसेच रामनगर, गांधीनगर, अंबाझरी टी पॉइंंट, जयताळा रोड, त्रिमूर्ती नगर येथील एनआयटी गार्डन, तेलंगखेडी, शंकर नगर, जुना फुटाळा, गोपाल नगर, वायुसेना नगर, खामला आदी ठिकाणी झाडे पडल्याने काही वेळ रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
सुभाष नगर ते माटे चौक दरम्यान मोठे झाड पडल्याने एका बाजूची वाहतूक बंद पडली होती. हिंगणा मार्गावर दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे वाहनांची रांग लागली होती. स्वावलंबी नगरचा रस्ता काही वेळ बंद होता. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शहरातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी आल्या. परंतु मंगळवारी दुपारी पडलेल्या पावसाने अध्या तासातच शहराची दाणादाण उडवली. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांना जागा मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. काहींना पावसात भिजावे लागले. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. लवकरच विदर्भासह नागपूर शहरातही दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
....
जोराचा पाऊस आल्यास काय होणार
मंगळवारी दुपारी अर्ध्या तासात शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला नसल्याने पाणी तुंबले. पावसाळ्यात जोराचा पाऊस आल्यास काय होणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. आता तरी मनपाची यंत्रणा जागी होईल. अशी अपेक्षा आहे.