लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रवारी नागपूरचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. रात्रीचे तापमान २३.७ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवडाभर शहरात अशाच प्रकारचे वातावरण राहणार आहे. आकाशात ढगाळ वातावरण असले तरी तापमान ४० डिग्रीवर राहील. दुपारी उकाडाही जाणवेल. पाऊसही येऊ शकतो. विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये तापमान कायम होते. ब्रह्मपुरी ४४.२ डिग्रीने सर्वाधिक उष्ण राहिले. चंद्रपुरात ४४, अकोला ४३.९, अमरावती ४३.६, वर्धा ४३.३, यवतमाळ ४२.५, गडचिरोली व वाशीममध्ये ४२, बुलडाणा ४१, गोंदिया ४०.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
नागपुरात वाऱ्यासह अनेक भागात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:59 PM
शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रवारी नागपूरचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. रात्रीचे तापमान २३.७ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देदिवसभर चालला ऊन सावल्यांचा खेळ