नागपूर : मागील चार दिवसांपासून खंड पडलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी नागपुरात पुन्हा दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने वातावरण थंडावले.
केवळ अमरावती वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासात शून्य मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपुरातही पावसाची नोंद नाही. सोमवारी दुपारी पावसाचे वातावरण निर्माण होऊनही पाऊस आला नाही. सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान चांगला पाऊस आला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने काही प्रमाणात बॅकलाग दूर केला असला तरी शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
...
आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस
मुंबई वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मान्सून पुन्हा १० दिवसांच्या लांबणीवर गेला आहे. त्यामुळे विदर्भात सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस येईल, असा अंदाज आहे. तर, वेधशाळेच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने येत्या २७ ऑगस्टपर्यंत नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
...