लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : मुसळधार पावसाचा फटका पिके, प्रवासी व घरांसाेबतच वधू, वर व त्यांच्या नातेवाईकांनाही बसला. नक्षी (ता. भिवापूर) येथे मंगळवारी (दि. २१) लग्नसाेहळा आयाेजित केला हाेता. तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सकाळी लग्नमंडप व परिसरात पाणी साचले. त्यामुळे हा लग्नसाेहळा ऐनवेळी भिवापूर शहरात पार पडला.
नक्षी येथील शिक्षक विलास करकाळे यांच्या मुलाचे बुटीबोरी येथील मुलीशी लग्न जुळले. मुलगी नात्यातील असल्याने लग्नसाेहळा मंगळवारी सकाळी नक्षी येथेच आयाेजित केला हाेता. त्यासाठी मंडपही उभारून आकर्षक सजावटही केली हाेती. वधूकडील मंडळी सकाळी नक्षी येथे पाेहाेचणार हाेती. मात्र, सकळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरातील सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली हाेती.
परिणामी, नक्षी येथे पाेहाेचण्याची समस्याही निर्माण झाली. दरम्यान, नववधू व तिचे कुटुंबीय सकाळी भिवापूर शहरात दाखल झाले हाेते. पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावयाची झाल्यास त्यांनी रात्रीपर्यंत वाट बघावी लागली असती. त्यामुळे मधला मार्ग काढल वर व त्याच्या कुटुंबीयांनी भिवापूर शहर गाठले आणि तिथेच त्यांचा विवाह पार पडला.
210921\1930-img-20210921-wa0131.jpg
लग्न मंडपात असे पुराचे पाणी शिरले होते.