नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भात पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी जोराचा तर काही जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज असला तरी हा आठवडा मात्र पावसाचाच आहे.
नागपुरात मागील २४ तासात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली. तापमानाचा पाराही बराच खालावला आहे. २.३ अंश सेल्सिअसने पारा खालावून २८.८ वर आला आहे. यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. सकाळी आर्द्रता ९२ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी ८९ टक्के होती. ग्रामीण भागात तुरळक पाऊस पडल्याची माहिती आहे.
मागील २४ तासात विदर्भात बुलडाणामध्ये २३ मिली आणि गोंदियात १७.६ मिली असा चांगला पाऊस झाला. या सोबतच, अकोला ५.१, अमरावती १.२, गडचिरोली ३ आणि वर्धा येथे २.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. ... विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३१.७ : २३.२
अमरावती : २८.८ : २२.५
बुलडाणा : ३१.० : २३.०
चंद्रपूर : ३२.२ : २४.२
गडचिरोली : ३१.० : २४.४
गोंदिया : २८.६ : २१.४
नागपूर : २८.८ : २३.८
वर्धा : २८.५ : २४.०
वाशिम : २८.६ : १८.८
यवतमाळ : २९.० : २४.५