लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांच्या उसंतीनंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा नागपुरात वादळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अधरा तास जोराचे वादळ आणि त्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. हवामान विभागाने या आठवडाभर पुन्हा नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.
सोमवारी नागपुरात ढगाळलेले वातावरण असले तरी ऊन होते. आजही दिवसभर रविवारसारख्या दमट वातावरणाचा अनुभव आला. रविवारपेक्षा ०.६ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊन पारा ३६.८ वर सरकला होता. सकाळी आर्द्रता ७८ टक्के असली तरी सायंकाळी ५५ टक्क्यांवर घसरली होती; मात्र सायंकाळनंतर आलेल्या पावसाने वातावरण थंडावले.
मागील २४ तासांत विदर्भात चंद्रपुरात अधिक पाऊस झाला. तिथे ३९.६ मिमी पावसाची नोंद आहे. यासोबतच, यवतमाळात १७.२, गोंदिया ६.८, गडचिरोली ५.६, अमरावती २.२, तर अकोलामध्ये ०.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
हवामान विभागाने १८ जूनपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३७.२ : २४.९
अमरावती : ३५.० : २३.४
बुलडाणा : ३६.० : २२.०
चंद्रपूर : ३२.६ : २२.८
गडचिरोली : ३३.४ : २४.०
गोंदिया : ३४.५ : २४.०
नागपूर : ३६.८ : २५.२
वर्धा : ३५.५ : २४.६
वाशिम : अप्राप्त : १९.२
यवतमाळ : ३४.२ : अप्राप्त