शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:07 AM

नागपूर शहरातील सर्व सिग्नलवर महापालिका ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देआग्याराम देवी चौकातील सिग्नलवर पहिला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यात झालेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’मध्ये विजयी ठरलेल्या ‘सिग्नल आयलँड’या संकल्पनेचा उपयोग करून शहरातील सर्व सिग्नलवर महापालिका ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी दिली. या पथदर्शी प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.ट्रू ग्रीन एनर्जी यांच्या माध्यमातून शहरातील सर्व सिग्नल, महामार्ग व अन्य ठिकाणी हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिला टप्पा म्हणून सिग्नल आयलँडच्या पायलट प्रकल्पाचे आग्याराम देवी चौकातील सिग्नलवर महापौरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सभापती लता काडगाये, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ट्रू ग्रीन एनर्जीचे अमित सरकार, मंगेश मेढेकर, गजानन आखरे, राजू गुहे, दिगंबर आमदरे, अश्वजीत गाणार, हेमंत वाघ आदी उपस्थित होते.भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील शासकीय, निमशासकीय व खासगी मोठ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक आहे. त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती नंदा जिचकार यांनी दिली.

‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’मधील संकल्पनापावसाच्या पाण्याचे संकलन करून ते जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिकेच्या मुख्यालयातही करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, महामार्ग आदी ठिकाणी पावसाचे पाणी थांबविण्याची अथवा ते जमिनीत मुरविण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. शहरातील महत्त्वाच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवसंकल्पना मेयर इनोव्हेशन अवॉर्डमध्ये मांडण्यात आल्या होत्या. त्यातूनच ही संकल्पना पुढे आल्याची माहिती जिचकार यांनी दिली.

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकारRainपाऊस