शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

नागपुरात गरजत बरसत आला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:36 PM

‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोलीसह पश्चिम नागपुरातील तर अनेक चौक जलमय झाले होते.

ठळक मुद्देअर्धा तास दमदार बरसात, उपराजधानी पाणीपाणी : अनेक भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोलीसह पश्चिम नागपुरातील तर अनेक चौक जलमय झाले होते.

नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५.३० पर्यंत सरासरी १८.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मौदा तालुक्यात सर्वाधिक ८७.६० मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ढग दाटून आले होते, परंतु पाऊस पडला नाही. दुपारी शहरात ऊन पडले होते व उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६.३० नंतर मात्र जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका जास्त होता की सीताबर्डी, धंतोली, सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर चौक, धरमपेठ, गोकुळपेठसह सायंकाळी ७.३० वाजता गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचीदेखील कोंडी झाली होती. पाण्याचा निचरा होण्यासदेखील बराच वेळ लागला. 
मनपाची पोलखोलकेवळ अर्धा तासाच्या पावसाने मनपाने नदी व नाल्यांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या दाव्यांची पोलखोल केली. फूटपाथवरील नाल्या चोक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरात काही ठिकाणी झाडेदेखील पडल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या.पंचशील चौकात दुकानांपर्यंत पाणीपंचशील चौकात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. दुकानांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली होती. पाऊस लवकर थांबल्याने दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अलंकार टॉकीज ते शंकरनगर चौकादरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचले होते.अर्धा डझन झाडे पडलीशहरात अर्ध्या डझनाहून अधिक झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात पंचशील चौक स्थित जसलीन हॉस्पिटलजवळ, त्रिमूर्ती नगरातील नागोबा मंदिराजवळ, खामला येथील शिवमंदिराजवळ, जय बद्रीनाथ सोसायटी, धंतोलीतील रामकृष्ण मठाजवळ झाड पडले.चार दिवस पावसाचेहवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील अनेक भागात २० ते २३ जुलैदरम्यान जोरदार पाऊस येऊ शकतो. या कालावधीत चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसासाठी वातावरणाची स्थिती अनुकूल आहे.पावसामुळे वीज पूरवठा खंडितअर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला. हिंगणा येथून येणाऱ्या १३२ केव्ही लाईन ट्रीप झाल्याने शंकरनगर, गांधीनगर, डागा ले-आऊटसह पश्चिम नागपुरातील अनेक भागातील वीज ग्राहकांना फटका बसला. दुसरीकडे रामकृष्ण मठाजवळ विजेचा खांब तुटल्याने सहा ट्रान्सफार्मर ठप्प झाले. त्यामुळे शेकडो ग्राहकांची वीज खंडित झाली. धंतोली तकिया आणि रामदासपेठमध्ये विजेच्या लाईनवर झाडाची फांदी तुटल्याने सुरेंद्रनगर कंडक्टर फुटले. त्यामुळे प्रतापनगर, अत्रे-ले-आऊट, गणेश कॉलनीतील वीजपुरवठाही प्रभावित झाला. शिवाय स्वावलंबीनगरातही वीज गूल होती. या ठिकाणी अनेक नागरिक सबस्टेशनवर पोहोचले होते. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या बहुतांश फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत होता. मेयो फिडरवर समस्या निर्माण झाली. हिंगणा सब स्टेशनमधून होणारा वीजपुरवठा प्रभावित झाल्याने त्याच्याशी जुळलेले फीडर बंद होते. तर पावसामुळे नारा फिडर बंद करावे लागले.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर