पालकमंत्र्यांनी दिले कामे करण्याचे निर्देश : विकास कामांसाठी १० कोटींचा निधी जाहीरउमरेड : रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गैरसोय, अवैध बांधकाम, सांडपाण्याची समस्या, घराच्या छतावरून गेलेली हायटेंशन लाईन, बसस्थानक येथील विविध समस्या, अड्याळवाले ले-आऊट, कृपानगर, दुर्गानगरी, आंबेडकर ले-आऊट आदी भागांमधील विविध प्रश्न आणि समस्यांचा उमरेडकरांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमक्ष पाऊस पाडला. नियोजित वेळेत पावसाचा अडसर आणि तब्बल दोन तास उशिरा सुरू झालेला ‘आपल्या समस्येसाठी शासन आपल्या दारी’ या उपक्रमात नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोपविल्या. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिलेत. मी पाठविलेल्या पत्रावर तातडीने कामे झाली पाहिजेत, असे म्हणत शहर विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी आ. सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, प्रभारी उपमुख्याधिकारी हरिश्चंद्र झाडे, डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. राजीव पोतदार, आनंद राऊत, डॉ. मुकेश मुदगल, संजय जयस्वाल, विजयलक्ष्मी भदोरिया, धनंजय अग्निहोत्री, शुभांगी हटवार, सुधा जनबंधू, जिल्हा परीषद सदस्य पदमाकर कडू, कृउबासचे सभापती रूपचंद कडू, पंचायत समितीचे उपसभापती गोविंदा इटनकर, विकास गिरी, प्रा. श्रीकांत पांडे, रमेश खांदाडे, दामोधर मुंधडा, भास्कर येंगळे, सुभाष कावठे, माया पाटील, पुष्पा कारगावकर, प्रतिभा मांडवकर, अरुण गिरडकर, लेमन बालपांडे, अर्चना बगडे, राम भाकरे, विनय बालपांडे, मुकेश आंबोने, प्रदीप चिंदमवार, अरविंद हजारे, केशव ब्रम्हे, चरणसिंह अरोरा, किशोर पारवे, किशोर हजारे, उमेश वाघमारे, घनश्याम लव्हे, गोलू जैस्वानी, मुन्ना बुटोलिया, गिरीश लेंडे, चरण डहाके, प्रशांत ढोके, जितेंद्र बैस, विवेक गजघाटे, गणपत हजारे, सोनू गणवीर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. पुनश्च एकदा आढावा बैठक घेण्याची विनंती यावेळी आ. सुधीर पारवे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
उमरेडमध्ये समस्यांचा पाऊस
By admin | Published: October 03, 2016 3:10 AM