ठळक मुद्देवर्धा, यवतमाळात पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाला खरे उतरत परतीच्या पावसाने बुधवारी सकाळपासून नागपूरसह वर्धा व यवतमाळात जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने पावसाचा अंदाज अधिकच गडद केला होता. सकाळी ८ च्या सुमारास किरकोळ ते मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नागपुरातही गडगडाटासह पाऊस कोसळत होता.या पावसामुळे तापमान अधिकच घसरले असून, थंडीत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारपर्यंत शहरात जोरदार वारे सुटल्याने जनजीवनही विस्कळित झाले आहे. पावसाने कापूस, तूर, चणा, सोयाबीन व धान या पिकांचे अतोनात नुकसान होते आहे.