लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, आलू, कांदे, लसूण, सोयाबीन, तूर डाळही भिजली. त्यामुळे शेतकरी व व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले.कळमना धान्यगंज अडतिया मंडळाचे पदाधिकारी अतुल सेनाड यांच्यानुसार बाजारात व्यापारी-अडतिया पावसाची शक्यता लक्षात घेता वेळोवेळी ताडपत्री टाकून धान्य व भाजीपाला भिजण्यापासून वाचवतात. परंतु शनिवारी अचानक पाऊस आला आणि कुणलाच काही करता आले नाही. त्यामुळे येथे ठेवलेले धान्याची जवळपास २०० पोती पावसात भिजली. नेहमी होणारे हे नुकसान रोखण्यासाठी त्यांनी अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर धान्य बाजाराच्या बाहेर शेड लावण्याची मागणी केली.ठोक धान्य व्यापारी चंद्रशेखर वाघ यांच्यानुसार बाहेर ठेवलेले शेतकºयांचे सोयाबीन, चणा, तूर डाळीची जवळपास २०० पोती पावसात भिजली. कळमना आलू, कांदे, अदरक, लसूण बाजार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष इलाही बक्षी यांच्यानुसार आलू, कांदे, लसणाची १५० पोती ओली झाली. अध्यक्ष अमोल गुलवाडे यांनी सांगितले की, कळमना मार्केट यार्ड परिसरातील ७० दुकानांमध्ये ठेवलेली आलू, कांदे, लसणाची जवळपास १५०० पोती पावसात भिजली. माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनीसुद्धा बाहेर शेड लावण्याची मागणी केली.मिरची बाजारातील रस्ते खराबठोक मिरची व्यापारी संजय वाधवानी यांच्यानुसार दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरची बाजारातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. मिरचीची आवक नसल्याने शिल्लक असलेला माल व्यापाºयांनी यार्डच्या आत ठेवला आहे. रस्ता खराब झाल्याने ये-जा करण्यास त्रास होत आहे.
पावसात भिजले धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:32 AM
शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, .....
ठळक मुद्देकळमन्यात शेतकरी-व्यापाºयांचे नुकसान : आलू, कांदे, लसूण, तूर डाळही भिजली