शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिशन विदर्भ! नागपुरात रेल्वेनं पोहोचले, ढोल-ताशांचा 'आवाज' घुमला; ५ दिवस पक्ष बांधणीवर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:28 AM

Raj Thackeray In Nagpur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

Raj Thackeray In Nagpur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास करत ते सकाळी नागपुरात दाखल झाले. राज ठाकरेंचं नागपूर रेल्वे स्थानकावर यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. आज ते नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे प्रयत्न करत असून २२ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच पाच दिवस ते विदर्भात असणार आहेत. पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी बोलून पक्ष बांधणीवर ते लक्ष देणार आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यांना स्वत: राज ठाकरे भेट देणार आहेत. तसंच उद्या ते पत्रकार परिषद घेणार आहेत.  

राज ठाकरे यांनी आजवर नागपूर किंवा विदर्भावर विशेष फोकस केला नव्हता. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये पश्चिम नागपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते नागपूर मार्गे वणी येथे प्रचारासाठी गेले होते. हे दोन प्रसंग वगळता त्यांनी नागपुरात संघटनात्मक आढावा बैठक घेतलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. रात्री इतर पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत.

राज ठाकरेंचा आदेश आला, मनसे नेते लागले कामाला; युतीबाबत अखेर ठरलं!

मनसे स्वबळावर लढणारमनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे