राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:34 PM2018-05-21T23:34:44+5:302018-05-21T23:35:07+5:30
देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मनोगत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मनोगत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. नागपूर शहर काँग्रेस कमिटी व राजीव गांधी स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यामाने भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्राचार्य हरिभाऊ केदार, विदर्भ संघटक, राजीव गांधी स्टडी सर्कल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. बबनराव तायवाडे, नासुप्रचे माजी विश्वस्त अनंतराव घारड, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल कोटेचा, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, कार्यप्रमुख व सरचिटणीस गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, डॉ.मनोहर तांबुलकर,जयाल जैसनानी, प्रशांत धवड, गिरीश पांडव, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.
पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात करून महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ काँग्रेसच्या काळात झाली. महिलांना आरक्षण दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना संधी मिळाली. म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आज कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता ‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’अशा घोषणा करीत असल्याचा आरोप हरिभाऊ केदार यांनी केला. पंचायत राज व महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे. राजीव गांधी यांची आहुती बेकार जाणार नाही. काँग्रेसच्या कार्यकत्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव सक्रिय राहावे, असे आवाहन विकास ठाकरे यांनी समारोपातून केले. पंचायत राज हा विकासाचा गाभा असल्याचे विलास मुत्तेमवार म्हणाले. अनंतराव घारड, उमाकांत अग्निहोत्री यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. बबनराव तायवाडे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शहर काँग्रेस सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले.
प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
यावेळी उमेश शाहू, फिरोज खान, मालिनी खोब्रागडे, नरेश शिरमवार, लीलाबाई म्हैसकर, अशोक निखाडे, धरम पाटील, महेश श्रीवास, वासुदेव ढोके, भारती कामठी, शब्बीर करीम, सुलभा नागपूरकर, श्रीराम उके, हर्षला साबळे, निर्मला बोरकर, गीता काळे, मालिनी सरोदे, मंदा वैरागडे, बबन दुरुगकर, अरुण अनासने, दिनेश तराळे, पिंटू बागडी, मो.समीर, वसीम खान, पंकज पांडे, हफीज खान, प्रकाश बाते, नीलेश खोरगडे, राजेद्र नंदनकर, येनिक नंदनकर, आशितोष कांबळे, विनोद चवरे, पंकज निघोट, अरविंद वानखेडे, आकाश तायवाडे, गोविंद ढोंगे, वैभव काळे, पंकज थोरात, रवी गाडगे, कुमार बोरकुटे, राकेश कनोजे, चंदाभाऊ राऊत, युवराज देवतळे, पुरुषोत्तम पारमोरे, विलास वाघ, चंद्रकांत वासनिक, विनायक देशपांडे, मिलिंद सोनटक्के, नीरज मेश्राम, देवा उसरे, सचिन कालनाके, विवके नेवारे, राहुल चैरसिया, मनीष वाघमारे, युगलक विदावत, सूरज आवळे, अंबादास गोंडाणे, कमलेश लारोकर, विजय माजरेकर, अमरजित ढोले, नंदा घोडसे, ईश्वर घोराडकर, प्रशांत धाकणे, हेमंत चैधरी, ईश्वर सातपुते, वासिम खान, प्रमोद शेख, यशवंत खानोरकर, श्याम चरडे, रत्नमाला फोपरे, मीनाक्षी साखरे, स्मिता कुंभारे, मंदा वैरागडे, रश्मी धुर्वे, लीलाबाई सतीश तारेकर, रमेश नांदे, भोला कुचनकर, दिलीप चाफेकर, यांच्यासह सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.