कामठी : सैनिक छावणी परिसरातून वाहणाऱ्या कन्हान नदीवरील महादेव घाटावर १९ फेब्रुवारी २०२० रोजी दोन शाळकरी मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. यात नूतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नवव्या वर्गात शिकणाऱ्या प्रवेश प्रवीण नागदेवे यांचा समावेश होता. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने शाळेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास प्रस्ताव सादर केला होता. या योजनेंतर्गत लाभार्थींना ७५ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे मृत विद्यार्थ्यांचे वडील प्रवीण नागदेवे व आई पुष्पलता नागदेवे यांना मदतीचा धनादेश कामठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप नागपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता तुषार रडके, उपमुख्याध्यापक वामन मन्ने, मुख्य लिपिक सतीश दहाट यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:07 AM