शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

रजनी लांजेवारला सात वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:56 AM

बहुचर्चित पीयूष अशोक गाडेकर आत्महत्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देन्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुचर्चित पीयूष अशोक गाडेकर आत्महत्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.रजनी लांजेवार (३३) ही अंबाझरी भागातील वर्मा ले-आऊट येथील रहिवासी आहे. मृत पीयूष गाडेकर हा २२ वर्षांचा तरुण प्रतापनगर भागातील अनसूयानगर भामटी रिंगरोड येथील रहिवासी होता. तो रविनगर येथील प्रगती महाविद्यालयाचा बीसीए द्वितीय वर्षांचा विद्यार्थी होता. त्याने २४ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रजनी लांजेवार हिच्या बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. पीयूषचे वडील अशोक रतिराम गाडेकर यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी ६ एप्रिल २०१२ रोजी रजनीविरुद्ध भादंविच्या ३०६ कलमान्वये (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीयूष याचे वडील अशोक गाडेकर यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय असल्याने त्यांची रजनीचे पती अ‍ॅड. प्रवीण लांजेवार यांच्याशी घटनेच्या दोन वर्षांपूर्वीपासून ओळख होती. लांजेवार हे नोटरीचेही काम करायचे. गाडेकर हे नेहमी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे पत्र अ‍ॅड. लांजेवार यांच्याकडूनच करायचे. हळूहळू गाडेकर आणि लांजेवार यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. पीयूष हा आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात मदत करीत होता. भूखंडाची खरेदी-विक्री, विक्रीपत्र तयार करणे, बँकेत पैसे जमा करणे आदी काम तो करायचा. त्यामुळे त्याचेही अ‍ॅड. लांजेवार यांच्या घरी येणे-जाणे होते. पीयूष आणि रजनीमध्ये परस्पर संबंध निर्माण झाले होते. हे दोघे इतरत्र फिरताना पीयूषच्या मित्रांना दिसायचे. त्याचे मित्र याबाबत पीयूषच्या वडिलांना सांगायचे. पीयूष पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे वडिलांना समजले होते. पीयूषने वडिलांच्या आड त्यांच्या व्यवसायातील दीड-दोन लाख रुपये रजनीला उधार दिले होते. त्याने आपले पैसे परत मागितले असता, तिने पैसे देण्यास नकार दिला होता. उलट ती वाईट परिणामाची भीती दाखवून पीयूषला वारंवार पैसे मागू लागली होती. रजनीमुळे त्रस्त होऊन पीयूषने तिच्याच बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. धांडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी रजनीला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे, फिर्यादी अशोक गाडेकर यांच्यावतीने अ‍ॅड. नबाब खान, अ‍ॅड. नीता गौतम आणि आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी काम पाहिले. पीयूषला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात रजनीला अटक झाली नव्हती.सतत ती अटक टाळत होती. सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने रजनी लांजेवार हिला अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिला अटकपूर्व जामीन मिळाला होता. सतत अटक टाळणाºया रजनीला गुरुवारी न्यायालयाने शिक्षा सुनावताच ती ढसाढसा रडली. अखेर तिला कारागृहात जावेच लागले.