शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

 नागपुरातील कुख्यात राजू भद्रेसह सर्व आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 9:44 PM

सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. अन्य आरोपींमध्ये दिवाकर कोत्तुलवार, सुनील भाटिया, नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक तेवर, भरत दुबे व मंगेश शेंडे यांचा समावेश आहे.१३ डिसेंबर २०१५ रोजी काही अज्ञात आरोपींनी राऊत यांचे अपहरण केले होते. दरम्यान, आरोपींनी राऊत यांना जबर मारहाण केली व डोक्याला बंदूक लावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राऊत व त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राऊत यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३४२, ३६४(अ), ३६५, ३८४, ३८५, ३८६, ५०४, ५०६(ब) अंतर्गत एफआयआर नोंदविला. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींतर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. राजेश तिवारी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयKidnappingअपहरण