शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:48 PM

वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो.

ठळक मुद्देकर्जासाठी एकाच सदनिकेची कागदपत्रेएक कोटीची रक्कम उचलली : तहसील ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो.आरोपी राकेश हा स्वत:ला कॉन्ट्रॅक्टर आणि आॅटोमोबाईल्सचा मालक सांगतो. आपले सेंट्रल एव्हेन्यूवर आॅटोमोबाईल्स आहे, अशीही बतावणी करतो. तो बनावट कागदपत्रे तयार करण्यात पटाईत आहे. या व्यवसायाची बनावट कागदपत्रे तयार करून त्याने लाखोंची आर्थिक उलाढाल दर्शविणारी कागदपत्रे बँकांमध्ये सादर केली होती. त्या आधारे त्याने गांधीबागमधील यूको बँकेच्या शाखेत गजानन अपार्टमेंट, म्हाळगीनगरमध्ये सदनिका विकत घेण्यासाठी ५ आॅक्टोबर २०१५ ला कर्ज प्रकरण सादर केले. १० दिवसात विक्रीपत्र नोंदणी क्रमांक एनजीएन एस- ३६१४ सादर केले तसेच अन्य कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर १६ आॅक्टोबरला त्याने १८ लाखांची रक्कम बँकेतून उचलली. ही रक्कम उचलल्यानंतर त्याने बँकेकडे फिरकणे बंद केले. त्याचे कर्जाचे हप्ते थकल्याने बँक अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.पत्नीचाही सहभागपुढच्या चौकशीत ठगबाज राकेशने विक्रीपत्र नोंदणी क्रमांक एनजीएन एस- ३६१४ च्या आधारेच बँक आॅफ महाराष्टच्या सहकारनगर शाखेतून, स्टेट बँकेच्या किंग्सवे शाखेतून, पंजाब नॅशनल बँकेच्या सूर्यनगर, कळमना शाखेतून आणि इंडियन ओव्हरसिज बँकेच्या हुडकेश्वर शाखेतून प्रत्येकी १८ ते २२ लाख अशी कर्जाची रक्कम उचलली. आरोपी राकेश राऊतच्या या बनवाबनवीत त्याची पत्नी ललिता हिनेही हातभार लावल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढला आणि राकेशसोबतच तिच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राकेशला अटक करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर