लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.श्री श्री रविशंकर हे अयोध्या प्रकरणात उच्च न्यायालयाद्वारे गठित समितीचे सदस्य होते. देशाने बऱ्याच काळापासून अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जावे हे स्वप्न पाहिले आहे. तेथे असेच मंदिर बनले पाहिजे ज्यामुळे देशात शांती प्रस्थापित होईल. भव्य मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. राममंदिर निर्माण कार्याची देखरेख करणाऱ्या समितीत मी सहभागी होणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
राममंदिरामुळे देशात सामाजिक सौहार्द वाढेल : श्री श्री रविशंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:06 AM
अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देकोट्यवधी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार