नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना प्राचार्य राम शेवाळकर वाङमयीन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ‘प्राचार्य राम शेवाळकर’ यांच्या नावाने सर्जनशील लेखक, भाषा अभ्यासक, अभ्यासू वक्ता, संत साहित्याचे अभ्यासक व संशोधक आणि वाङमयीन कार्यकर्ता अशा वर्गवारीने गेल्या पाच वर्षापासून ‘प्राचार्य राम शेवाळकर वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्कार देण्यात येत आहे. सन २०२१-२२चा हा पुरस्कार १९८२ पासून आजपर्यंत विदर्भ साहित्य संघात कार्यरत असलेले व एकहाती महत्त्वाची भूमिका पार पडत असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना देण्यात येत आहे.
हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात पार पडणार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार म्हैसाळकर यांना प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार व गिरीश गांधी उपस्थित राहतील, अशी माहिती महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक व कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे यांनी दिली.
................