ऑनलाइन लोकमत
भामरागड, दि. ९ - डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात ‘ईद बोक्का पहसी’ या शब्द उच्चारांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना हसायला लावणा-या टेकडा येथील पहिल्या आदिवासी कलावंत रामे पोरया बोगामी यांचे गुरूवारी रात्री १० वाजता घरीच निधन झाले.
८५ वर्षीय रामे बोगामी अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. रानभाज्या व वनौषधींच्या त्या जाणकार होत्या. त्यामुळे त्यांना को-या पाटीवर वेद लिहिणारी महिला म्हणूनही परिसरात ओळखले जायचे. डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटात आदिवासी स्त्रीची बोलकी भूमिका साकारून ‘ईद बोक्का पहसी’ वाक्याने नाना पाटेकर यांना रामे बोगामी यांनी भरभरून हसविले.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने टेकला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.