लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक मैदानात उतरणार आहेत. तर नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवार यादी जाहीर झालेली नव्हती.२००९ मध्ये रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे वासनिक यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना पराभूत केले होते. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत तुमाने यांनी पराभवाचे उट्टे काढत वासनिक यांना १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला होता. यावेळी रामटेकच्या जागेवर काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनीही दावा केला होता. मात्र, वासनिक यांनाच केंद्रीय निवड समितीने पसंती दिली. जिल्हा व प्रदेश काँग्रेसनेही वासनिक यांच्याच नावाची शिफारस करणारा अहवाल अ.भा. काँग्रेस कमिटीकडे पाठविला होता. १९७७ ते २०१४ या ३७ वर्षांतील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठवेळा काँग्रेस आणि चारवेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. यावेळी वासनिक ‘भगवा’ उतरवून रामटेकचा गड सर करतात का, याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, नागपूरसाठी छाननी समितीने नाना पटोले यांच्या नावाला दोन दिवसांपूर्वी संमती दिली होती. सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
रामटेकमध्ये पुन्हा वासनिक, पटोले नागपुरात पक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:15 AM
रामटेक लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक मैदानात उतरणार आहेत. तर नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवार यादी जाहीर झालेली नव्हती.
ठळक मुद्देदिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब : अधिकृत घोषणेची प्रतीक्षा