शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!

By जितेंद्र ढवळे | Published: June 04, 2024 11:41 AM

Ramtek Lok Sabha Results 2024 : कॉंग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचे गडावर पहिले पाऊल...

जितेंद्र ढवळे रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असलेला शिंदेसेनेला धक्का बसला आहे. येथे कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी 28064 मते घेत शिंदेसेनेचे राजू पारवे यांना 3361 मतांनी मागे टाकले आहे. पारवे यांना 24403 मते मिळाली आहेत. 

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नागपुरातील कळमना येथील मार्केट यार्डात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 18 एप्रिल रोजी रामटेक मतदारसंघात 29 लाख 49 हजार 85 मतदारांपैकी 12 लाख  50  हजार 190 (61.01 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत कॉंग्रेसशी बंडखोरी करीत अपक्ष लढणारे किशोर गजभिये यांना 942 मते मिळाली आहेत. याशिवाय ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेले वंचितचे शंकर चहांदे यांना 108 मते मिळाली आहे. 

जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. यानंतर झालेल्या राजकीय ‘महाभारता'नंतर रामटेकची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली होती. 

रामटेकच्या रणागणांत 28 उमेदवार असले तरी मतमोजणीतही कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि शिंदेसेनेचे राजू पारवे यांच्यात थेट टक्कर होताना दिसत आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. त्यामुळे अंतिम निकाल सायंकाळी 6 नंतर येण्याची शक्यता आहे.  

येथील ईव्हीएम मोजणीतून बादरामटेकअंतर्गत कामठी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा कामठी येथील मतदान केंद्र क्रमांक 499 येथे मतदानाच्या दिवशी सीयूमधून मॉक पोल डेटा क्लीअर न केल्याचे प्रकरण आहे. त्यामुळे येथील ईव्हीएम मोजणीसाठी घेतली जाणार नाही.

असे झाले मतदान :विधानसभा - एकूण मतदार- एकूण मतदान - टक्केवारीकाटोल - २,७३,८१४ - १,७२,३९० - ६२.९६सावनेर - ३,१४,६०५ - १,९३,२६९ - ६१.४३हिंगणा - ४,२४,१५८ - २,२९,७३३ - ५४.१६उमरेड - २,९३,८२९ - १,९७,३४१ - ६७.१६कामठी - ४,६६,२३१ - २,७३,६४१ - ५८.६९रामटेक - २,७६,४४८ - १,८३,८१६ - ६६.४९एकूण - २०,४९,०८५ - १२,५०,१९० - ६१.०१ टक्के 

अशी होईल मतमोजणी विधानसभा - फेरी- काटोल : 17- सावनेर - 19- हिंगणा - 23- उमरेड - 20- कामठी - 26- रामटेक - 18

असे आहेत उमेदवार :राजू पारवे शिवसेना (शिंदे गट)श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)संदीप मेश्राम (बसपा)शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी)किशोर गजभिये (अपक्ष)आशिष सरोदे (भीमसेना)उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी)मंजुषा गायकवाड (अखिल भारतीय परिवार पार्टी)गोवर्धन कुंभारे (वीरों के वीर इंडियन पार्टी)प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)ॲड. भीमराव शेंडे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी)भोजराज सरोदे (जय विदर्भ पार्टी)सिद्धेश्वर बेले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -ए)रोशनी गजभिये (गोंडवाना गणतंत्र पार्टी)विलास खडसे (बहुजन मुक्ती पार्टी)सिद्धार्थ पाटील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)संजय बोरकर (महाराष्ट्र विकास आघाडी)संविधान लोखंडे (बळीराजा पार्टी)अजय चव्हाण (अपक्ष)अरविंद तांडेकर (अपक्ष)ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष)कार्तिक डोके (अपक्ष)गोवर्धन सोमदेवे (अपक्ष)प्रेमकुमार गजभारे (अपक्ष)सुरेश लारोकर (अपक्ष)विलास झोडापे (अपक्ष)सुनील साळवे (अपक्ष)सुभाष लोखंडे (अपक्ष)

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकnagpurनागपूर