लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक गडमंदिर परिसरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. आठवडाभरात चोरट्यांनी पुन्हा एकदा गडमंदिर परिसरातील दुकानांना लक्ष्य करीत एकाच रात्री तब्बल २५ दुकाने फोडण्याचा प्रताप केला. यात त्यांनी १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोऱ्यांमुळे येथील दुकानदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री गडमंदिर परिसरातील एकूण २५ दुकानांमध्ये चोरी करीत विविध साहित्य व रोख रक्कम चोरून नेली. या सर्व दुकानांमधून एकूण १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा सर्व प्रकार शनिवारी सकाळी संबंधित दुकानदारांच्या निदर्शनास आला.गडावरील वाहनतळाजवळ असलेल्या पायºयांजवळ कच्चा चिवडा, बेलफूल, शीतपेयांची दुकाने आहेत. या दुकानदरांची गुंतवणूक अल्प असल्याने त्यांची मिळकतही तशी कमीच आहे. यावेळी चोरट्यांनी त्याच दुकानांना लक्ष्य केल्याने त्यांच्या हाती फार मोठी रक्कम लागली नाही. यावेळी चोरट्यांनी सुरक्षा भिंतीबाहेरील दुकानांमध्ये चोरी केली. दुसरीकडे, या चोºयांमुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच ठाणेदार दीपक वंजारी यांनी सहकाºयांसह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.आठवडाभरातील दुसरी घटनाभगवान श्रीरामाच्या गडमंदिर परिसरात दुकाने फोडण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना होय. यापूर्वी चोरट्यांनी रविवारी (दि. २२) मध्यरात्री येथील १७ दुकाने फोडली होती. त्यात एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे. त्यातच चोरट्यांनी वराह मंदिर व भैरव दरवाजा जवळच्या दुकानांमध्ये हात साफ केला.
रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:33 PM
रामटेक गडमंदिर परिसरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. आठवडाभरात चोरट्यांनी पुन्हा एकदा गडमंदिर परिसरातील दुकानांना लक्ष्य करीत एकाच रात्री तब्बल २५ दुकाने फोडण्याचा प्रताप केला. यात त्यांनी १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोऱ्यांमुळे येथील दुकानदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
ठळक मुद्देदुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण