लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात रानभाजी महाेत्सवाचे साेमवारी (दि. ९) आयाेजन करण्यात आले हाेते. यात तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी सहभाग नाेंदवित विविध रानभाज्यांची विक्री केली.
या महोत्सवात पारशिवनी तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी जंगल भागात उगवणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या करटोली, अळू, भुईनिम, तरोटा, रानचवळी, बांबू, टेकोळे (मशरूम) यासह अन्य रानभाज्या आणल्या हाेत्या. तज्ज्ञांनी या रानभाज्यांचे उपस्थितांना महत्त्व पटवून दिले. अनेकांनी त्या चांगल्या दराने खरेदी केल्याने शेतकरीबांधवांना यातून उत्पन्नही मिळाले. आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने रानभाजी महाेत्सव व प्रदर्शन आयाेजित करण्यात आल्याचे यावेळी आयाेजकांनी स्पष्ट केले.
महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मीना कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सहायक खंडविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रेम भोंडेकर उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी डाॅ. ए. टी. गच्चे यांनी प्रास्ताविकातून या रानभाज्यांचे महत्त्व, त्यांची औषधी गुण, त्या नामशेष हाेण्याची कारणे, त्यांच्या संवर्धनाची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ए. एन. देशमुख यांनी केले. यशस्वितेसाठी जी. बी. वाघ, एस. आर. शेंडे, पी. जी. सोमकुवर, अमित झोड यांच्यासह कृषी विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
100821\img_20210809_123917.jpg
रानभाज्या महोत्सव