कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसचा राजीनामा देत आपण नागपुरातून आपला दौरा सुरू करून काँग्रेस रिकामी करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, दोन दिवस उलटूनही राणेंचा विदर्भवारीचा मुहूर्त ठरलेला नाही. विदर्भात अपेक्षित प्रतिसाद मिळेल की नाही, कोण कोण उघडपणे येतील, समर्थन देणाºयांची ताकद किती आहे, याची राणेंकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. ताकदीचा अंदाज निश्चित अंदाज घेऊनच दौºयाची आखणी होणार असल्याची माहिती आहे. राणे यांनी काँग्रेस सोडताना नागपूरचा विशेष उल्लेख केला.त्यामुळे राणे कधी नागपुरात येतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. राणे सोमवारी नागपुरात येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात नाराज काँग्रेस नेत्यांनी नागपुरात आखलेल्या मोहिमेमुळे नागपुरात आपल्याला पाठबळ मिळेल, या अपेक्षेतून राणे यांनी नागपूरची निवड केली असावी, असा अंदाज आहे. राणेंच्या नागपूरवारीच्या घोषणेमुळे सुरुवातीला काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, नागपूरसह विदर्भात राणे यांच्या गळाला मोठे नेते लागणार नाहीत, याची खात्री पटल्यामुळे काँग्रेस नेते काहीसे निश्चिंत झाले आहेत.चव्हाण, मोहन प्रकाश यांनी घेतला आढावाराणे यांच्या प्रस्तावित नागपूर, विदर्भ दौºयावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश लक्ष ठेवून आहेत. पक्षातून कोण-कोण राणेंसोबत जाऊ शकतात, कोण उघडपणे समर्थन करू शकतात, त्यांच्या जाण्याने काय नुकसान होऊ शकते याचा आढावा या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून शहर व जिल्हाध्यक्षांकडून घेतला आहे. राणेंमुळे विदर्भात फारसे नुकसान नाही, असेच अहवाल सर्वच जिल्ह्यातून गेल्यामुळे पक्षश्रेष्ठी काहीसे निश्चिंत झाले आहेत.समर्थक नव्या पक्षात जाणे टाळतीलविदर्भातील राणे समर्थक एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, राणे हे भाजपात गेले तर त्यांना विदर्भातील त्यांच्या समर्थकांकडून अधिक पाठबळ मिळू शकते. शेवटी स्थानिक नेत्यांसाठी स्वत:चे राजकीय पुनर्वसनही महत्त्वाचे आहे. राणे भाजपात गेले तर स्थानिक नेत्यांनाही भाजपाचा आधार मिळेल. मात्र, राणे यांनी स्वत:चा पक्ष काढला तर मात्र स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर काँग्रेससह भाजपासोबत संघर्ष करण्याची वेळ येईल. अशा परिस्थितीत समर्थक राणेंसोबत संबंध कायम ठेवतील, पण त्यांच्या नव्या पक्षात जाणे टाळतील.नाराज नेतेही राणेंपासून अंतर ठेवूनचप्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर नागपूरसह विदर्भातील काही नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांनी एकत्र येत मोट बांधली व विदर्भ काँग्रेसची मागणी करीत चव्हाणांच्या नेतृत्त्वावर नेमही साधला. त्यामुळे या नेत्यांची राणे नागपूर दौºयात भेट घेतील, अशी चर्चा आहे. मात्र, पक्षात राहून आपली बाजू मांडण्यात गैर नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होऊ शकत नाही. पण, पक्ष सोडून बाहेर पडलेल्या राणेंसोबत उघडपणे हात मिळविले तर ‘हायकमांड’कडून कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चव्हाणांवर नाराज असलेले नागपुरातील नेते राणेंपासून अंतर ठेवूनच राहण्याची अधिक शक्यता आहे.
राणेंची विदर्भात चाचपणी;वारीचा मुहूर्त ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:39 AM
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसचा राजीनामा देत आपण नागपुरातून आपला दौरा सुरू करून काँग्रेस रिकामी करणार असल्याचे जाहीर केले.
ठळक मुद्देकुणाची भेट घेणार याची उत्सुकता : काँग्रेस नेते मात्र निश्चिंत