बाजारगाव : गणपती-हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त रविवारी बाजारगाव येथील हनुमान मंदिर परिसरात गणेश आराधनेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चालेल्या या भक्तिसोहळ्यात भाविकांनी श्रीगणेशाचे दर्शन घेत कोरोनामुक्तीचा संकल्प केला. शनिवारी (दि. ३०) रोजी सायंकाळी डिगडोह पांडे येथील भजन मंडळातर्फे श्रीगणेशाची आराधना करीत वातावरण भक्तिमय केले. रविवारी सकाळी शीवा सावंगा येथील भजन मंंडळातर्फे करण्यात आलेल्या भजन सादरीकरणानंतर महाआरतीनंतर दहिकाला आयोजित करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या भक्तिसोहळ्यात भेट देत श्रीगणेशाचे दर्शन घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांचा ट्रस्टचे अध्यक्ष नाना गावंडे, सचिव राजेंद्र घायवट आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
बाजारगावच्या गणपती मंदिरात रंगला भक्तिसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:41 AM