शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

खंडणी बनली गळ्यातील हड्डी

By admin | Published: January 02, 2016 8:37 AM

बुकी कम बिल्डरकडून वसूल केलेली पावणेदोन कोटींचे खंडणी प्रकरण अनेकांसाठी गळ्यात फसलेली हड्डी ठरले आहे.

नरेश डोंगरे ल्ल नागपूरबुकी कम बिल्डरकडून वसूल केलेली पावणेदोन कोटींचे खंडणी प्रकरण अनेकांसाठी गळ्यात फसलेली हड्डी ठरले आहे. पोलिसांनी आक्रमक भूमिका स्वीकारल्याने या अपहरण आणि खंडणी कांडाशी जुळलेले अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे गुन्हेगारी जगतात या खंडणीने दोन मोठ्या टोळ्या आमने-सामने येण्याच्या तयारीत असल्याने नागपुरात गँगवॉर घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.काही बिल्डर, काही व्यापारी, बुकी, काळाबाजारी अन् अवैध धंदे करणारी मंडळी नागपुरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांशी जुळलेली आहेत. ती वेगवेगळ्या गुंडांना नियमित ‘प्रोटेक्शन मनी’ देत असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. ही मंडळी अनेकदा एखाद्या वादग्रस्त व्यवहारात गुंंडाला भागीदार बनवितात किंवा त्याच्याकडून व्याजाने रक्कम उचलतात. भाईची रक्कम असल्यामुळे पुढे व्यवहारात कोणती आडकाठी येत नाही. अनेकदा माहिती असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर प्राप्त झालेली रक्कम ठरलेल्या हिस्सेदारीत वाटून घेतली जाते. सौदा फिस्कटला किंवा व्यवहार वादग्रस्त झाला तर कुरबुरी वाढतात. त्यानंतर कब्जा, मारहाण, अपहरणासारखे प्रकार घडतात. १३ डिसेंबर २०१५ लाही असाच प्रकार घडला. थेट गोव्यातील कॅसिनो, बडे बुकीशी संबंध असल्याची चर्चा असणाऱ्या अजय श्यामराव राऊत (वय ४५) या बुकी कम बिल्डरला १०-१२ गुंडांनी त्यांच्या घराजवळून कारमध्ये कोंबले. पाच कोटींची खंडणी मागतिली. राऊतने फोन करून अवघ्या दोन तासात केवळ तीन मित्रांकडून चक्क पावणेदोन कोटी रुपये जमविले. ते अपहरणकर्त्यांना देऊन राऊतने आपली मानगुट सोडवली. मात्र, प्रकरण गुन्हेशाखेत पोहचल्याने आणि पोलिसांनी खोदकाम हाती घेतल्याने या प्रकरणाशी जुळलेले भद्रे, हिराचंदानी, मुणोतसह अनेकजण चांगलेच अडचणीत आले आहेत.कोण आहे ‘तो’भाईसर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी मोठी खंडणी वसूलणारा ‘भाई ’ कोण, या प्रश्नाचे पोलिसांना उत्तर मिळालेले नाही. ते राऊतच सांगू शकतो. मात्र, तो टाळत असल्याने पोलीस अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्याला एकदाचे समोर बसविले की नंतर सारा घटनाक्रमच उघड करू, असा पोलिसांना विश्वास आहे. त्यामुळे पोलीस राऊतला हुडकण्यासाठी नागपूर ते गोवा सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. तर, एकदा पोलिसांसमोर बसलो की आपल्या अडचणी आणखी वाढतील, याची जाणीव असल्याने राऊत ‘आऊट आॅफ कव्हरेज’ झाला आहे. कुणाचा कोणता गेम ?हे सर्व होत असताना गुंडांच्या दोन तीन टोळ्या या प्रकरणात कुदल्या आहेत. ‘त्याला’ गोवले तर आपले वर्चस्व वाढेल, असा त्यामागे सरळ गेम आहे. त्यामुळे त्यांच्या रात्रीच नव्हे तर दिवसाच्याही बैठकां वाढल्या आहेत. गुन्हेगारी वर्तुळातील चलबिचल लक्षात आल्यामुळे पोलिसांनीही नजर रोखली असून, कोण, कोणता गेम खेळण्याच्या तयारीत आहे, त्याचा पोलीस कानोसा घेत आहेत.