लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपारीवाल्याला फोनवरून खंडणी मागणाऱ्या आणि न दिल्यास ‘तेरी सुपारी लुंगा’ अशी धमकी देणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.राजेश किशनचंद घई (वय ४२) हे क्वेट्टा कॉलनी लकडगंजमध्ये राहतात. लकडगंजमधील आॅक्ट्रॉय झोनमध्ये त्यांचे गोदाम आहे. भंडारा मार्गावरील राधाकृष्ण कमोडिटी ट्रेडर्स नावाने ते सुपारीवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करतात. आरोपी एकनाथ फलके (वय ३०, रा. पारडी, कळमना) आणि त्याच्या तीन साथीदारांनी बुधवारी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी राजेश घर्इंना फोन केला. आरोपींनी त्यांना तुला सुपारीचा धंदा करायचा असेल तर आज ३० हजार रुपये आणि पुढे दरमहा २५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. खंडणी दिली नाही तर तुला पाहून घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली. आरोपींची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात आरोपींचा उपद्रव वाढू शकतो, हे ध्यानात आल्याने घई यांनी लकडगंज ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे, जरीपटका, लकडगंज, नंदनवन, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सडक्या सुपारीचा गोरखधंदा करणारे अनेक जण आहेत. या सडक्या सुपारीवर सल्फरची प्रक्रिया करून आरोपी त्या काळ्याकुट्ट आणि आरोग्यास अपायकारक असलेल्या सुपारीला पांढरी बनवितात. ही सुपारी नागपुरातील पानटपरीवर खर्रा घोटणाºयांना विकली जाते. शिवाय नागपूर-महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही ही आरोग्याला घातक असलेली सुपारी पाठविली जाते. लोकमतने यासंबंधाने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सडक्या सुपारीचा हा विषय दोन वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनातही चर्चेला आला होता. संबंधित अधिकारी एखादवेळी कारवाई करून गप्प बसतात.अनेकांचे पाठबळसडक्या सुपारीच्या गोरखधंद्याला अनेकांचे पाठबळ आहे. पोलीस आणि अन्न व औषध तसेच पुरवठा विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी जीवाचा खेळ करणाºया व्यापाºयांकडून लाचेच्या रूपात महिन्याला लाखो रुपये घेतात. अनेक गुंडही या गोरखधंदेवाल्यांकडून महिन्याला लाखोंचा प्रोटेक्शन मनी घेतात. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारी मंडळी सुपारीवाल्यांकडून खंडणी वसुलतात. काहीं जणांनी तक्रारी ओरड करून या गोरखधंद्यात आता चक्क भागीदारी सुरू केली आहे. या धंद्यातील मास्टर मानला जाणाºया नितीनने आता स्वत:च हा जोडधंदा सुरू केला आहे. खंडणी दिली नाही की पोलीस, एफडीआयकडे तक्रारी करतात. सध्या शैलू, अक्षय, शरद ही नावे या गोरखधंद्यात खंडणी वसुलीसाठी चर्चेत आहेत. पोलिसांनी या खंडणीबाजांवर तसेच लाखों लोकांना कॅन्सरसारखा रोग देणाºया सडक्या सुपारीचा धंदा करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.
नागपुरात फोनवरून धमकी देऊन मागितली सुपारीवाल्याला खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:52 AM
सुपारीवाल्याला फोनवरून खंडणी मागणाऱ्या आणि न दिल्यास ‘तेरी सुपारी लुंगा’ अशी धमकी देणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देलकडगंजमध्ये गुन्हा दाखल