कामठी : कामठी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. संजय राव यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी अॅड. अविनाश भिमटे तर सचिवपदी अॅड. विलास जांगडे विजयी झाले. कामठी तालुका वकील संघाचे ५८ सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तालुका अध्यक्षपदी अॅड. संजय राव यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. अविनाश भिमटे यांना ३६ तर अॅड. महेश फालेकर यांना १६ मते मिळाली. सचिवपदाच्या निवडणुकीत अॅड. विलास सांगळे यांना ४३ तर अॅड. भूषण तिजारे यांना ९ मते मिळाली. सहसचिवपदी अॅड. प्रफुल्ल पुडके बिनविरोध निवडून आले. सदस्यपदी अॅड. राजविलास भिमटे, मयूर बोरकर, रिना गणवीर, सीमा गजभिये, अभिषेक नाथ यांची निवड झाली. वकील संघाच्या निवडणुकीत ५२ सदस्यांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. ए.बी. रामटेके यांनी काम पाहिले.
राव अध्यक्ष तर जांगडे सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:09 AM