शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:30 PM

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.मिथुन कैलास उईके (३१) रा. आंबेडकरनगर कंट्रोल वाडी असे आरोपीचे नाव आहे. पीडित २१ वर्षीय तरुणीसोबत आरोपीची फेसबुकवर मैत्री झाली. या मैत्री दरम्यान आरोपी १६ जून २०१८ रोजी पहिल्यांदा तरुणीच्या घरी आला. तेव्हा घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. तो तिला डोंगरगडला घेऊन गेला. तिथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केले. यानंतर सर्वांसमोर लग्न करण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागला. तरुणीच्या तक्रारीनुसार तिने लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मिथुनच्या कुटुंबीयांनी सुद्धा तरुणीशी लग्न करण्यास विरोध केला. नंतर मिथुननेही लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पोलिसांनी एनसी दाखल करून तिला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीची हिंमत आणखी वाढली होती. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.आरोपीचे मित्रही करायचे पाठलागपीडित तरुणीनुसार आरोपीचे काही मित्रही तिचा पाठलाग करू लागले होते. ती घरातून बाहेर निघाली की, आरोपीचे मित्र तिच्या मागे यायचे. बाईकवर आलेले युवक तोंडाला कापड बांधून असायचे. ते तिच्याशी अश्लील बोलून अपमानित करायचे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार