शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केली होती मात
2
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
3
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
4
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
5
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
6
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
7
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
8
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
9
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
10
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
11
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
12
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
13
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
14
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
15
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
16
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
17
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
18
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
19
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
20
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 3:01 AM

शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली.

नागपूर : शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली. या घटनेत एकापेक्षा जास्त आरोपींचा समावेश असल्याचा अर्थात हा सामूहिक बलात्काराचा प्रकार असल्याचा आरोप पोलीस ठाण्यासमोर जमलेला संतप्त जमाव करीत होता. पोलिसांनी मात्र या गुन्ह्यासंदर्भात वाच्यता करण्याचे टाळल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाचे वातावरण होते. कोपर्डी प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असतानाच, उपराजधानीत ही घटना घडल्याने पोलीस दलालाही जोरदार हादरा बसला आहे. २० तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लागला नसल्यामुळे, इमामवाडा परिसरात गुरुवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. पीडित मुलगी आठवीची विद्यार्थिनी आहे. नेहमीप्रमाणे ती बुधवारी सायंकाळी कराटे प्रशिक्षण वर्गाला गेली होती. वर्ग आटोपून घरी परत जात असताना रस्त्यात तिला एक आरोपी भेटला. ‘तुझी बहीण माझी मैत्रीण आहे. ती आता इकडेच येत आहे’, असे सांगून त्याने तिला फूस लावून मेडिकलच्या मार्गाकडे नेले. तेथे त्याचे दोन मित्र लपून होते. त्यांनी तिला मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रात्री ११ वाजले तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यातच ती घरी परतली. तिच्या तोंडावर, हातावर खरचटल्याच्या जखमा होत्या. ते पाहून पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पालकांनी लगेच इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी या घटनेची वार्ता कळताच परिसरातील संतप्त नागरिकांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त सुहास वारके, अतिरिकत आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. गुन्हे शाखेचीही पथके पोहोचली.