पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 08:07 PM2022-03-29T20:07:21+5:302022-03-29T20:07:56+5:30

Nagpur News सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे.

Rape of wife's girlfriend; Accused sentenced to ten years imprisonment | पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास

पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास

Next
ठळक मुद्दे गिट्टीखदानमधील घटना

नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे.

जुनैद ऊर्फ जिशान गुलजार ऊर्फ गुलशेर खान असे आरोपीचे नाव आहे. जुनैदची पत्नी नीती सिंग ऊर्फ जरीन खान, मित्र तिरथ ऊर्फ सोनू राकेश डहेरिया, सागर रमेश बावणकर व अंकित बंडू लोहकरे या आराेपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. पीडित तरुणी राजस्थान येथील रहिवासी आहे. ती लहानपणी नागपूरला रहात होती. नीती सिंग तिची मैत्रीण होती. पीडित तरुणी नागपूरला आल्यानंतर आवर्जून नीतीला भेटत होती. पीडित तरुणीला नागपुरातील भूखंड विकायचा असल्यामुळे तिने नीतीला ग्राहक शोधण्यास सांगितले होते. त्यानिमित्ताने पीडित तरुणी १६ जानेवारी २०२१ रोजी नीतीच्या घरी आली होती. १८ जानेवारी रोजी पहाटे ती झोपेत असताना आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच या कुकृत्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. त्यानंतर पीडित तरुणीने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी चौधरी यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. वर्षा साईखेडकर यांनी कामकाज पाहिले.

५१ हजार रुपये दंड ठोठावला

न्यायालयाने आरोपीवर एकूण ५१ हजार रुपये दंडही ठोठावला, तसेच दंडाची रक्कम पीडित तरुणीला भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश सरकारला दिले.

Web Title: Rape of wife's girlfriend; Accused sentenced to ten years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.