लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 20, 2023 06:02 PM2023-03-20T18:02:01+5:302023-03-20T18:03:05+5:30

सत्र न्यायालय : भिवापूर तालुक्यातील घटना

rape on minor by showing lure of marriage, ten years imprisonment for the accused | लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास

लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास

googlenewsNext

नागपूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सोमवारी दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. शरद त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. ही घटना भिवापूर तालुक्यातील आहे.

गुणवंत शांताराम जुगनाके (२८) असे आरोपीचे नाव असून तो कोरंबी, ता. नागभिड येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी १७ वर्षे वयाची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. तिला लग्न करण्याचे आमीष दाखविले होते. त्यामुळे १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पीडित मुलगी आरोपीसोबत पळून गेली.

दरम्यान, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तत्पूर्वी मुलीच्या वडिलाने भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस मुलीचा शोध घेत होते. ती तीन दिवसानंतर मिळून आली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदविला असता, आरोपीने बलात्कार केल्याची माहिती तिने दिली. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपाली गणगणे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

Web Title: rape on minor by showing lure of marriage, ten years imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.