शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

दुरावलेल्या मैत्रिणीवर बलात्कार

By admin | Published: October 24, 2015 3:21 AM

दुरावलेली मैत्रीण सोबत राहण्यास तयार नसल्याचे बघून एका गुंडाने तिला आपल्या घरात डांबून तिच्यावर सतत पाच दिवस पाशवी बलात्कार केला.

पाच दिवस डांबून ठेवले : पांढराबोडीतील घटनानागपूर : दुरावलेली मैत्रीण सोबत राहण्यास तयार नसल्याचे बघून एका गुंडाने तिला आपल्या घरात डांबून तिच्यावर सतत पाच दिवस पाशवी बलात्कार केला. या दरम्यान त्याने तिला बेदम मारहाणही केली. मयूर गोविंद बसवंते (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. तो पांढराबोडीत माता मंदिराच्या बाजूला राहतो. तक्रार करणारी तरुणी (वय २३) आरोपीची जुनी मैत्रीण आहे. ती पूर्वी त्याच्यासोबतच राहायची. आरोपी बसवंतेला हत्येच्या प्रयत्नात अटक झाली. त्याला कारागृहात डांबले गेले. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्यामुळे तरुणी त्याच्यापासून दूर झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने तिची शोधाशोध केली. ती ‘दुसरीकडे राहत’ असल्याचे कळले. त्याने तिच्याशी संपर्क करून तिला सोबत राहण्याचा आग्रह धरला. ती मानली नाही. त्यामुळे त्याने तिला मारहाणही केली. ती बधत नसल्याचे पाहून त्याने तिला चर्चा करण्याच्या बहाण्याने १७ आॅक्टोबरला घरी बोलवले. दुपारी ३ वाजता ती घरी आली. त्याने तिला पुन्हा सोबत राहण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच आरोपीने तिला बेदम मारहाण केली. तिच्यावर पाशवी बलात्कारही केला. त्यानंतर तिला घरात डांबून ठेवले. तो बाहेर जाताना घराचे दार लावून जायचा. पळून गेल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकून, ठार मारण्याची धमकी देत होता. तब्बल ५ दिवस त्याने तिला डांबून ठेवून मारहाण करीत तिच्यावर वारंवार पाशवी बलात्कार केला. दसऱ्याचा दिवस असल्यामुळे गुरुवारी त्याने आपले दार उघडे ठेवले. ती संधी साधून तरुणी बाहेर पडली आणि तिने सरळ अंबाझरी ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी बसवंतेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपीचा शोध घेतला जात आहे.