१७ वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी अकरावीला शिकत होती. २० वर्षाचा विकास भुजाडे तिचा नातेवाईक आहे. विकासने अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. जून महिन्यात तो तिचे अपहरण करून बंगळूरला घेऊन गेला. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत सापडले. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेतला असता अल्पवयीन विद्यार्थिनी विकास सोबत बंगळूरला असल्याचे समजले. पोलिसांनी बंगळूर येथून विकासला ताब्यात घेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीची सुटका केली. तपासात विकासने तिचे शारीरिक शोषण केल्याचा खुलासा झाला. त्या आधारे पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला. शारीरिक संबंध केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या सहमतीने तिचा गर्भपात करण्यात आला. या घटनेनंतर अल्पवयीन विद्यार्थिनी तणावात राहत होती. चार दिवसांपूर्वी विकास जामिनावर सुटला. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबात आई वडील आणि लहान भाऊ आहे. सोमवारी दुपारी सर्वजण बाहेर गेले होते. घरी कोणीच नसल्याचे पाहून अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी पोहोचल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती समजली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिच्या आईने वडिलांना घटस्फोट दिल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. परंतु आपल्या पालनपोषणाबद्दल अल्पवयीन विद्यार्थिनीने कधीच तक्रार केली नव्हती. अशा स्थितीत शारीरिक शोषण केल्यामुळे आरोपी जामिनावर सुटल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी शंका आहे. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.
...............