लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने मुदतीपूर्वी जन्म दिलेले अर्भक मरण पावले. मुलीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपचार करावे लागले. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.पीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असून ती १२ वर्षे ४ महिने वयाची आहे. आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली असा आरोप आहे. यासंदर्भात १४ मार्च २०२० रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी ती २३ आठवड्यांची गर्भवती होती. उच्च न्यायालयाने मुलीची तपासणी व अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन केले होते. त्या मंडळाने मुलीची तपासणी करून गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला व मुलीचे बाळ जिवंत जन्माला येऊ शकते असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अशा बाळांच्या संगोपनासाठी काय योजना आहे अशी विचारणा सरकारला करून १५ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय अर्भक बाहेर काढावे लागले. ते अर्भक जन्म घेतल्यानंतर काही वेळातच दगावले. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला या घडामोडीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. पीडित मुलीतर्फे अॅड. स्वीटी भाटिया तर, सरकारतर्फे अॅड. नितीन राव यांनी कामकाज पाहिले.
बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचे अर्भक दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 8:36 PM
बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने मुदतीपूर्वी जन्म दिलेले अर्भक मरण पावले. मुलीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपचार करावे लागले. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
ठळक मुद्देसरकारची हायकोर्टात माहिती : प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश